प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज भाजप पक्षाच्या भव्य मेळावा चाकण येथील भाग्य लक्ष्मी मंदिरात पार पडला. या मेळाव्याला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मा.अजय पाठक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या मेळाव्यात अब की बार 400 पार असा नारा देत पुणे जिल्ह्यातील 36 नंबरच्या लोकसभा मतदार संघात भाजप पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी चालू केलेली यावरून दिसून आले.


या भव्य मेळाव्याला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मा अजय पाठक,भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे,जिल्हाप्रमुख शरद बुट्टे पाटील,तालुका प्रमुख अतुलभाऊ देशमुख,शांताराम भोसले, प्रियाताई पवार या दिगग्ज पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा उल्लेख नेत्यांनी भाषणावेळी केला.


व येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा उमेदवार निवडुन येण्यासाठी बूथ प्रमुख, केंद्र प्रमुख, व नवीन पद ग्रहण केलेले पदाधिकारी यांचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी 36 नंबरच्या मतदार संघातील पक्षाचे कार्यकर्ते व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
