प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या वतीने येत्या जागतिक महिला दिनानिमित्त भव्य सखी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक फायदा होत होत असून या सखी मेळाव्यांना गेली दोन वर्षे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

दिनांक – ९ व १० मार्च २०२४ रोजी
स्थळ – चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय वाडा रोड.
वेळ – सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत.
राजगुरुनगर शहरातील महिलांच्या कलागुणांना आणि घरगुती व्यवसायाला ग्राहक आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राजगुरुनगर शहरातील सर्वात मोठा “भव्य सखी मेळावा” चे आयोजन केले आहे.

त्यात शहरातील महिलांनी घरगुती पद्धतीने आणि प्रेमाने बनविलेले विविध प्रकारचे खाद्य स्टॉल, चॅट, शीतपेय, फास्ट फूड, चटकदार लोणची, वळवणाचे अनेक प्रकार, उन्हाळी पदार्थ, फ्लेवर्ड शेवई, मुखवास, थाळी प्रकार आपल्याला चाखता येणार आहे. त्याच बरोबर मनोरंजनाचे आकर्षक खेळ खेळत मेळाव्याचा आनंद लुटता येणार आहे.तसेच घरगुती वापराच्या अनेक वस्तू, घरगुती पद्धतीनें बनवलेली विविध सौंदर्य प्रसाधने, ज्वेलरी, आर्ट आणि क्राफ्ट च्या वस्तू, पुस्तके, आपल्याला खरेदी करता येणार आहे.

*हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन, राजगुरुनगर आयोजित “भव्य सखी मेळावा ” आपल्याच गावातील मैत्रिणींच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी, मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह मेळाव्यास जरूर येण्याचे आवाहन केले आहे.