प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा हे महाराष्ट्रातील एक मोठ खंडोबाचे देवस्थान आहे .या खंडोबा नगरीमध्ये विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री युवराज शिंदे यांची तर व्हॉ.चेअरमन पदी सुनीता भगत यांची बिनविरोध निवड झाली. सर्व संचालकानी या दोघांना पाठींबा दर्शवून सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुभद्रा बगाटे यांनी काम पाहिले.

गावातील श्री युवराज शिंदे हे प्रगतशील शेतकरी आहेत.व जय मल्हार यात्रा व्यवस्था मंडळाचे संचालक म्हणून आणि न्यू इंग्लिश हायस्कूल श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिलेले आहे.तसेच गावातील महिलांसाठी कल्याणकारी योजना राबऊन महिला सक्षमीकरनाला हातभार सुनीता भगत यांची व्हा चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

यावेळी बाजार समितीचे संचालक श्री विजयसिंह शिंदे पाटील महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील सहकार नेते हिरामण अण्णा सातकर पाटील युवा नेते सुधीर भाऊ मुंगसे अँड देविदास शिंदे पाटील आदर्श सरपंच अमर भाऊ शिंदे पाटील विद्यमान उपसरपंच दिलीप भगत सर्व सोसायटीचे संचालक सर्व आजी माजी सरपंच समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र निमगाव खंडोबा सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.