प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले.गेल्या 7 दिवसांपासून त्यांनी अन्न, पाणी, सोडल्याने त्यांच्या प्रकृती आता दिवसेंदिवस खालावत चालली असून तरी सरकारकडून अजून कोणती पाऊले उचलली गेली नाहीत.

त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी व मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या शनिवार दिनांक 17/2/2024 रोजी शिरोली या। ठिकाणी खेड तालुका क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील सर्व मराठा बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.