Post Views: 366
श्रीकृष्ण होले गुरुजी यांनी केली होती सुरवात
दर्यापूर प्रतिनिधी महेश बुंदे:-
नगरपरिषद हद्दीमधील बनोसा भागातील गांधीनगर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्तिक मासानिमित्त सकाळी ५ वाजता काकडा आरतीद्वारे बनोसा परिसरातील विविध धार्मिक स्थळावर जाऊन पुजन केले जाते.
काकड आरतीची सुरुवात अकोट रोड स्थित हनुमान मंदिरातून होते त्यानंतर काकडा गजानन महाराज मंदिर आठवडी बाजार, शनि महाराज मंदिर आठवडी बाजार, राम मंदिर पाटील पुरा, बालाजी मंदिर पाटीलपुरा, मेळेश्वर महादेव मंदिर, मंगल बाबा मंदिर गांधीनगर मार्गे पुन्हा हनुमान मंदिर येथे येतो. टाळ-मृदंग भजनाद्वारे प्रभातफेरी प्रदक्षिणा केल्या जाते. ५६ वर्षाअगोदर १९६५ मधे दर्यापूर न.प.चे सेवानिवृत्त शिक्षक स्व. श्रीकृष्णराव होले गुरुजी यांनी या काकडा आरतीची सुरवात केली होती व आज ते निघून गेले तरी त्याच्या निधनानंतरही आजसुद्धा ही धार्मिक कार्यक्रमाची परंपरा तिसरी पिढी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवित आहे. प्रातःकाळी विविध भजनाच्या सुमधुर आवाजाने साखर झोपेत असणारे सर्व नागरिक जागे होतात.
हा काकडा आरती उपक्रम राबविण्याकरिता
विनोद थेटे, प्रल्हाद पारडे, रघुनाथ वील्हेकर, नंदकिशोर विल्हेकार, रविंद्र संगोले, हेमंत होले, किशोर वाघळकर, दिलीप अग्रवाल, तुळशीराम टेकाडे, हभप धनेश महाराज ढोके, रामेश्वर मेहेर, प्रफुल ढोबळे, गाजाभाऊ उगले, ज्ञानेश्वर कराळे, सुरेंद्रा विल्हेकर, मंगेश भाऊ पतींगे, राजू सोळंके, दीपक गावंडे, विष्णू राऊत, ईश्वर पारडे,संजय मालिये,पवन निमावत, दिव्यांक होले आदी परिश्रम घेतात.