चाकण वार्ता:- भारतीय जनता पार्टी, चाकण शहरच्या वतीने चाकण मधील श्री.शिवाजी विद्यामंदिर शाळेजवळ होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल चाकण पोलीस स्टेशन मध्ये निवेदन सादर केले .
निवेदननिवेदन
याप्रसंगी भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजनभाई परदेशी, भाजपा व्यापारी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मनोज शेठ मांजरे, भाजपा खेड तालुका संघटन सरचिटणीस श्री.प्रीतम शिंदे, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष श्री.अनिल सोनवणे, भाजपा चाकण शहराध्यक्ष श्री.अजय जगनाडे, भाजपा शहर उपाध्यक्ष श्री.प्रल्हाद परदेशी उपस्थित होते. निवेदन स्वीकारण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अशोक राजपूत साहेब त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे साहेब उपस्थित होते पोलिस प्रशासनाच्या वतीने सदर विषयाची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत, आणि तात्काळ कडक कारवाईचे निर्देश दिले गेले आहेत.