प्रतिनिधी कुणाल शिंदे:-
पुणे :- खेड तालुका बार असोसिएशन, विधी सेवा समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ” आजादी का अमृत महोत्सव ” या अभियानांतर्गत आज ०८ नोव्हेंबर २०२१ रोजी , गाव मौजे काळुस ,तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील, मा सभापती ज्योतीताई अरगडे , सरपंच धनश्री पवळे, उपसरपंच यशवंत खैरे, पोलीस पाटील रुपेश अरगडे,यांच्या उपस्थितीत सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

काळुस गावातील ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेंल्या सदर कार्यक्रमात खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. देविदास युवराज शिंदे पाटील, उपाध्यक्ष ऍड .गणेश गाडे ,ॲड. रीना मंडलिक , तालुका बार असोसिएशनचे सर्व सन्माननीय नवीन कार्यकारीणीचा सत्कार सरपंच धनश्री पवळे यांनी केला.या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री गणेश पवळे यांनी प्रस्ताविक केले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मा श्री. ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील अध्यक्ष खेड तालुका बार असोसिएशन यांनी केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सौ मा.सभापती ज्योती आरगडे मॅडम यांनी केले, प्रमुख वक्ते ॲड. पवन कड साहेब यांनी माहिती अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन केले , आणि ॲड. अनिल ढवळे साहेब यांनी महिलांच्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले , उपाध्यक्ष रीना मंडलिक मॅडम यांनी सातबारा याविषयी मार्गदर्शन केले,अध्यक्षीय भाषण मा श्री. ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील खेड तालुका बार असो. यांनी केले. त्यावेळी शिंदे साहेब यांनी ग्रामीण भागातील जनतेला कायद्याचे ज्ञान झाले पाहिजे तरच जनता कायद्याबाबत साक्षर होइल, ग्रामीण भागातील काही जनतेची परिस्थिती जेम तेम असते अशा व्यक्तींना विधी सेवा समिती मार्फत वकील फि न देता वकील नेमता येतो प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस पाटील रुपेश अरगडे यांनी केले.
