प्रतिनिधी कुणाल शिंदे:-
दिपावली निमित्त सावरदरी गावातील ठाकरवाडीत जाऊन फराळ व मिठाई वाटप करून ह्या वर्षीची दिवाळी सावरदारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.गेली दोन वर्षे कोरोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे अश्यात या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज उमटुन दिवाळीचा सण आनंदमयी जावो या उद्देशाने एक सामाजिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासन्याचे प्रयत्न सावरदरी ग्रामपंचायतीने केले त्याबद्दल सरपंच,उपसरपंच,सदस्य पोलिस पाटील यांचे मनस्वी आभार आदिवासीं बांधवांनी मानले आहे.

ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच श्री भरत तरस उपसरपंच श्री संदिप बाळासाहेब पवार, सदस्य श्री संदिप मेंगळे, सौ मिराबाई कदम,सौ बारकाबाई गावडे, पोलिस पाटील राहुल साकोरे, राष्ट्रवादी काँग्रेस विभाग अध्यक्ष श्री अमोल पानमंद,मा उपसरपंच लालासाहेब मेंगळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेटे, कुंडलिक बुचुडे, संतोष शिंदे सर, आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.सावरदरी ग्रामपंचायत नेहमी सामाजिक दृष्टिकोन ठेऊन समाजहितासाठी काम करेल असे मत सरपंच भरतशेठ तरस यांनी बोलताना व्यक्त केले. या उपक्रमात सहभागी होता आले यांचा आनंद वाटला व आदिवासी बांधवांची दिवाळी गोड झाली याचे समाधान वाटले.
