Post Views: 528
दर्यापूर प्रतिनिधी महेश बुंदे:-
राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला पाठिंबा आणि सहभाग जाहिर केला आहे.
दर्यापूर आगारासमोर सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संघटनेच्या उपोषणाला व त्यांच्या या लढ्याला राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूर तर्फे मनोज तायडे तालुका अध्यक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे व सर्व महाराष्ट्र सैनिक यांच्यासोबत आहे याकरिता त्यांना सदर जाहीर पाठिंब्याचे पत्र मनसे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायगोले, गोपाल तराळ , पंकज कदम, लकी गावंडे , प्रथमेश राऊत , राम शिंदे, संदीप झळके, संतोष रामेकर, शुभम रायबोले, रोशन कावडकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये पाठिंब्याचे पत्र मनसे दर्यापुर तर्फे देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व संघटनेचे वतीने आपल्या मागण्या माण्य करण्याकरीता शासन दरबारी पाठपुरावा केला असून त्या दृष्टीने सरकारने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे सर्व एस. टी कामगारांची व परीवाराची दिवाळी अंधारात गेली व त्यांच्या काही सहकारी मित्रांनी आत्महत्या सुद्धा केली आहे, त्यांच्या मागण्या रास्त असून सरकारने गांभीर्याने विचार न केल्यास आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात पेटणार आहे तरी सरकारने याबाबत लवकरच निर्णय घ्यावा.