आदीशक्ती महीला बहुऊद्देशिय संस्थेचा मदतीचा हात,उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दिली आर्थिक मदत

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम- आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्था वाल्हई तर्फे शिवाय नमः मठ संस्थान कारंजा येथे आयोजित कार्यक्रमात “विद्याश्री शिष्यवृत्ती” प्राप्त होतकरू विद्यार्थ्यांना ऊच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाय नमः मठ संस्थानचे मठाधिपती मरूळसिध्द शिवाचार्य स्वामी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण कानकीरड,आदीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा कविता ठाकुर,संचालक निर्मलसिंह ठाकुर, संस्थेच्या कार्यक्रम समन्वयक निता खाडे हे ऊपस्थित होते.
संस्थेतर्फे गेल्या सात वर्षांपासून ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांकरिता विविध योजना राबवण्यात येत आहेत.

या योजनांचा विद्यार्थ्यांना फायदा होत असून त्यातील काही विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना अधिकची आर्थिक मदत म्हणून या वर्षी वर्ग 12 वीला कि.न.कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य विभागातून प्रथम आलेला व सध्या HVPM महाविद्यालय, अमरावती BBA च्या प्रथम वर्षाला असलेला संदेश गलबले,D.Pharm.च्या प्रथम वर्षाला असलेल्या मयुरी जाधव या विद्यार्थ्यीनीला, अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील असलेल्या व सध्या बिकट परीस्थितीवर मात करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर येथे MBBS ला प्रवेश घेतलेल्या बालाजी ठाकरे या विद्यार्थ्याला,अंकीता पोटपिटे या अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील असलेल्या, या वर्षी विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य विभागातून प्रथम आलेल्या आणि B.Com. ला प्रवेशीत विद्यार्थ्यीनीला बँकींग परीक्षेकरीता लागनारी पुस्तकें घेण्याकरिता, अतिशय बिकट परिस्थितीत ईलेक्ट्रीशियन ट्रेड मध्ये ITI शिकत असलेल्या अक्षय आडे या विद्यार्थ्यांना संस्थतर्फे धनादेश देऊन आर्थीक मदत करण्यात आली.


कार्यक्रमाचे सुख संचालन संस्थेचे कार्यक्रम समन्वयक हेमंत पापळे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यक्रम समन्वयक संतोष नेमाने यांनी केले.तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे कार्यक्रम समन्वयक गोपाल कदम यांनी केले. या कार्यक्रमाला शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी आणि त्याचे पालक ऊपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!