ब्युरो रिपोर्ट स्वराज्य वार्ता
दिल्ली :- गेल्या 2 दिवसांपासून पुकारलेल्या मालवाहतूकदारांचा संप अखेर मिटला आहे. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारचं माल वाहतूकदारांना दिले आहे.त्यामुळे सरकार संपावर तोडगा काढण्यात यशस्वी झाले आहे. या संपाचे पडसाद संपूर्ण देशभरात पहायला मिळाले.

माल वाहतूक दारांच्या संपामुळे अनेक ठिकाणी देशभरात महामार्गावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच भाजीपाला,दर मोठ्या प्रमाणात वधारले व पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होती. डिझेल न मिळाल्याने रुग्णवाहिका, व स्कूल बसच्या संघटना देखील यामध्ये सहभागी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

केंद्रीय गृह सचिव आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची बैठक पार पडली. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही अंस आश्वासन केंद्र सरकारने माल वाहतूकदारांना दिले आहे. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचं वाहतूकदार संघटनेने आवाहन केले. नवा कायदा लागू होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका वाहतूकदारांनी मांडली.