प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खेड तालुक्यातील महिलेला उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल सन्मान देण्यात आला आहे. त्यांनी खेड तालुक्यातील माळी वधू वर मेळाव्याचे आयोजन करून अनेकांच्या सुखी संसाराला हातभार लावण्याचे काम केलं आहे.


महात्मा फुले विचार मंच यांच्या वतीने आज नारायणगाव येथे वधू वर परिचय मेळाव्यात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यापैकी खेड तालुक्यातील सौ मंगलताई शेवकरी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानपत्र,शाल,देऊन गौरविण्यात आले.