प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण औद्योगिक वसाहतील महाळुंगे नगरी आज सकाळी खुनाच्या घटनेने हादरली. भरदिवसा गावातील एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. तर त्याचा मित्र संदेश भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे, त्यामुळे वाढत्या खुनाच्या घटनांमुळे तालुक्याच्या औद्योगिक नगरीत अजूनही गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसलेला दिसून येत नाही.यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाळुंगे गावातील तरुण रितेश पवार (वय 24) हा सकाळी गावातून चाललेला असताना हल्लेखोरांनी महाळुंगे गावातील हॉटेल रेणुका समोर त्याच्यावर कोयत्याने व धारधार शास्त्राने वार करून निर्गुण खून करण्यात आला.यामध्ये रितेश या तरुणाचा जागीच मृत्यू झाला व त्याचा मित्र संदेश भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. खुनाच्या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी महाळुंगे पोलीस दाखल झाले आहे व आरोपींचा शोध सुरू केला आहे.खून झालेल्या तरुणाचे आत्ताच नवीन लग्न झाले होते त्यामुळे खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.