स्वराज्य वार्ता विशेष प्रतिनिधी
पुणे :- पुणे रेल्वे स्टेशनच्या विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या जागेत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ लवकरच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना आता चोवीस तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार आहे. पुणे विभागात सुरू झालेले हे दुसरे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे कोच रेस्टॉरंट 100 चौरस मीटर क्षेत्रफळावर रेल्वेच्या कोचमध्ये तयार करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना पार्सल सुविधा देखील करण्यात आली आहे.

या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’मध्ये लवकरच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑनलाईन पदार्थ बुकींग करण्याची सोय केली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांना 60 किलोमीटर अंतरावरून त्यांना हवा तो पदार्थ ऑर्डर करून ठेवावा लागेल. त्यानंतर रेल्वे गाडी स्थानकावर आल्यानंतर जागेवर तो पदार्थ प्रवाशांना मिळेल अशी सोय केली जाणार आहे.तसेच यासाठी whatsup no वर देखील सोय करण्यात आली असून त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे सूचित करण्यात आले आहे