प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- स्त्री शक्ती महिला बचत गट कुरुळी या गावातील महिलांना गेले सलग तीन दिवस मसाल्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. बचत गटातील महिलांना एकूण दहा मसाल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते.त्यामध्ये कांदा लसूण मसाला, गोडा मसाला,पाव भाजी मसाला, मिसळ मसाला चिकन मसाला,मटन मसाला, धना पावडर ,हळद, घरकुल मसाला गृहिणी मसाले आईच्या हातची चव हे त्यांचं मसाल्याचे ब्रँड त्यांनी बनवलेला आहे.हे प्रशिक्षण त्यांना हॅन्ड इन हॅन्ड या संस्थेने मोफत दिलेले होते हे प्रशिक्षण त्यांना शितल वरपे मॅडम, ओंकार सर, सुवर्णा कर्पे या मॅडम ने मार्गदर्शन केलेले आहे
