प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घरी दिवाळी साजरी करीत असताना पणतीने कपड्याला आग लागून कु.श्राव्या सोमनाथ पोतले (वय ५वर्ष) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पोचले कुटुंबावर अन दिवाळी दुःखाचा डोंगर कोसळला आहे
कुमारी कु.श्राव्या हिच्या ड्रेसला पणतीने आग लागल्याने ती भाजली. तिला तातडीने भोसरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला उपचारानंतर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता. परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला त्रास झाल्याने तिला चाकण येथील एकदा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचार चालू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पोतले कुटुंबावर ऐन दिवाळीच्या मध्ये मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.श्राव्या हिच्या जाण्याने एक गावातील हसती खेळती चिमुकली घर पोरकं झालं आहे.
सर्व पालकांनी आपल्या मुलांचे हट्ट पुरवताना व दिवाळी साजरी करताना आपल्या मुलांना दिवा पण त्या फटाके यापासून दूर ठेवा🙏🏻🙏🏻
लाडक्या कु.श्राव्याला स्वराज्य वार्ता चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली💐💐