प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :; मराठा आरक्षण बाबत सरकारची कार्यपद्धती पाहून खेड तालुक्यातील चिंबळी येथील कै.सिद्धेश सत्यवान बर्गे (वय वर्ष २१) ह्या युवकाने टोकाचे पाऊल उचलून आपले जिवन संपवले आहे.आज दुपारी मराठा आरक्षणावर सरकारची कार्यपद्धती पाहून निराश होऊन चिठ्ठी लिहून त्याच्या गॅस रीपेरिंग दुकानात टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यामुळे खेड तालुक्यातील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणारे ही दुसरी वेळ असुन त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

काल दुपारी सिद्धेश ने त्याच्या लहान भावाला मी मित्रांसोबत महाबळेश्वर ला चाललोय सांगितले व नंतर रात्री सहज त्याचा फोन लागत नाही म्हणून लहान भाऊ सोन्या ला काळजी लागली होती, मित्रांना फोन केला असता समजले की तो त्यांच्या सोबत नाही गेला फिरायला , मग दुकान बघितले तर ते बाहेरून बंद नवथे केले ,शटर वरती करून पाहिले तर काही तास झाले होते सिद्धेश ने स्वतःचा जीव संपवून, आज सकाळी त्याच्यावरती अंत्संस्कर करण्यात आले,

पोलिस तपासात त्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली त्यात त्याने लीहाले होते की मी मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही आणि की कार्यपद्धत आहे ती पाहून मी आत्महत्या करीत आहे , यास कोणाला दोषी धरू नये , मया सोन्या ,अप्पा,जिजी,आई ची काळजी घ्या असे लिहून त्याची सही खाली केलेली आढळली.

सिद्धेश बर्गे हा खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा एमआयडीसी बंद आंदोलन वेळी दिनांक २५/१०/२३ रोजी मोशी टोलनाका कुरुळी परिसरात आंदोलनात सक्रीय होता .२० ऑक्टोबरला झालेल्या मनोज जरांगेच्या सभेला देखील तो उपस्थित होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत
समाज बांधवांना नम्र विनंती आहे आपण कोणीच आत्महत्या करू नका , संयम ठेवा , एक दिवस आरक्षण मिळेल. आरक्षण पेक्षा आपला जीव महत्वाचा आहे .असे आवाहन खेड तालुका क्रांती मोर्च्यांच्या वतीने करण्यात आले आहे.