प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकणमध्ये आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व खेड तालुका तालुका क्रांती मोर्चाचे 4 बांधव त्यासाठी उपोषण करत आहे.या मराठी बांधवांना साथ देण्यासाठी सकल मराठा खेड तालुका आंदोलकांकडुन भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सर्वधर्मीय नागरिक,महिला, व लहान मुले सहभागी झालेले पाहायला मिळाले.. त्यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दर्शवून आम्ही देखील तुमच्या समाजासोबत आहोत ही भावना व्यक्त केली.
या भव्य मशाल मोर्चाची सुरवात चाकण बस स्टँड पासुन सुरू होऊन शेवट छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रांगणात झाला.चाकण शहरातून काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चात मराठा बांधव, महिला,लहान मुले सहभागी होऊन त्यांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा यावेळी दिल्या.चाकण शहरातील रस्त्यावर मराठे भगवा झेंडा, व मेणबत्ती हातात घेऊन उतरल्याने सगळे वातावरण मराठयांच्या आवाजाने दुमदुमले होते. अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पध्दतीने या मशाल मोर्चाला सर्वांनी हजेरी लावून आपली साथ दिली.यावेळी विद्यालयातिल छत्रपतींच्या पुतळ्यासमोर सुबक अशी रांगोळी काढण्यात आली होती.व उपोषणाला बसलेले मराठा बांधव, सकल मराठा क्रांती मोर्चाने आयोजक यांची भाषणे होऊन राष्ट्रगीत म्हूणून सांगता झाली. यावेळी चाकण पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येऊन व वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.