प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रासे गावातील महादेव मंदिराचे डागडुजीचे काम चालू झाले आहे.मंदिराला बांधण्यात आलेल्या बांधकामाचे प्लॅस्टर खाली पडल्याने डागडुजीचे काम पुन्हा केले जात आहे.

रासे गावात अनेक वर्षांपासून दगडी बांधकाम असलेले सुबक नक्षीदार महादेवाचे मंदिर आहे.या मंदिरात भोलेनाथ शंकराची स्वयंभू पिंड स्थापित केली गेली आहे.शेजारी दत्तगुरुचे मंदिर असुन या महादेव मंदिराला सभामंडप काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.परंतु आता या सभामंडपाचे बांधकामाचे प्लास्टर आता कोसळू लागले आहे. मागील महिन्यात तुफान झालेल्या पावसाने प्लास्टरचा तुकडा खाली पडला होता.

त्यामुळे ही बाब लक्षात आल्याने गावातील उद्योजक श्री सुनील रघुनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने मंदिराचे सभामंडपाच्या बांधकामाची डागडुजी चालू केली आहे.पहिल्यांदा मंडपाचे वॉटर प्रूफ केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या डागडुजीचे काम तातडीने सुरू केले असुन लवकरच मंदिराला पुन्हा सुंदर रूप प्राप्त होणार आहे. गावातील नागरिक श्री सुनील रघुनाथ शिंदे यांचे भोलेनाथावर असलेली भक्तीचे गावातील नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.