प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :-खेड तालुक्यातील मोई या गावातील हँड इन हँड या संस्थेकडून महिलांना मेहंदीचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गावातील अनेक महिलांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले व त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.या प्रशिक्षणाचा महिलांना संसारासाठी आर्थिक फायदा होणार आहे.


मोई गावात बचत गटातील आणि महिलांना सक्षमीकरण करण्याच्या हेतूने मेहंदी प्रशिक्षण हॅन्ड इन हॅन्ड इंडिया या संस्थेमार्फत मोफत देण्यात आले होते. त्यामध्ये गावातील 19 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन छान पद्धतीने मेहंदी काढण्याची कला शिकण्यास मिळाली आहे. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या संसाराला मोठा हातभार लावण्याचा एक मार्ग मिळाला आहे.हँड इन हँड या संस्थेकडुन 10 दिवस प्रशिक्षण देऊन महिलांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.त्यामध्ये महिलांनी छान प्रकारे सहकार्य करून आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

हँड इन हँड इंडिया या संस्थेचे ओंकार सर, मेहंदीचा प्रशिक्षण देणाऱ्या वैभवी मॅडम,यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.मोई गावातील बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुवर्णा कर्पे यांनी महिलांसाठी एक नवीन पद्धतीने स्थान बनवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.