प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे येत्या 20 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाने या सभेचे आयोजन केले असुन मराठा समाजातील बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्च्यांच्या साखळी उपोषणाला पाठबळ देण्यासाठी ही ऐतिहासिक सभा पहिल्यांदाच होणार आहे.मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 24 तारखेपर्यंत सरकारला अल्लटीमेंटम दिला आहे त्या आधी ही जाहीर सभा होणार आहे.

राजगुरूनगर जवळील पुणे नाशिक बायपास हावेजवळ 100 एकरात ही सभा होणार आहे. तालुक्यातील 5 ते 10 लाख मराठा बांधव या सभेसाठी येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे ही सभा ऐतिहासिक होणार आहे हे नक्की…