प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण करण्यासाठी आजपासून खेड पंचायत समितीमध्ये रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.आज पासुन सुरू झालेल्या या महोत्सवात तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिला बचत गटांनी सहभाग घेतला असुन वेगवेगळ्या रानभाज्या ,व त्यांपासून बनवलेले विविध पदार्थ यांची मेजवानी नागरिकांना पाहायला मिळणार आहे.या महोत्सवात 16 महिला बचत गट सहभागी झाले आहे व त्यांनी आपले स्टॉलवर आलेल्या नागरिकांना रानभाज्या व त्यांपासून बनवलेले पदार्थ यांची माहिती सांगत आहेत.

या कार्यक्रमावेळी तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा व महिला बचत गटाच्या प्रकल्प संचालक अधिकारी सौ शालिनी कडू मॅडम यांचा सत्कार महिला बचत गटाच्या crp कडून करण्यात आला.3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ग्रामीण महिलांनी आणलेल्या रानभाज्या, व पदार्थ यांची मेजवानी नागरिकांना पाहायला मिळणार आहेत.

