खेड वार्ता :- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या सेझ मधील कंपनीची ठेकेदारी स्पर्धा एका तरुण ग्रामपंचायत सदस्यासाठी जीवघेणी ठरली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून कनेरसर ग्रामपंचायतीच्या तरुण सदस्यची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तरुणाच्या चेहरा आणि डोक्यात अनेक वार करत हा खून करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगारांनी हा खून केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील कनेरसर येथील रहिवासी 31 वर्षीय संतोष रामदास दौंडकर असे खुन झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. संतोष रामदास दौंडकर यांचा खेड तालुक्यातील सेझ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात बहुतांशी कंपन्यांमध्ये क्रेन पुरवण्याचा व्यवसाय आहे. कमी कालावधीत संतोष दौंडकर यांनी आपल्या व्यवसायात चांगला जम बसवला होता त्याच स्पर्धेतून संतोषच्या खुनाचा प्रकार घडला असा अंदाज व्यक्त होत आहे.
कंपनी गोडाऊनजवळ हल्ला
संतोष दौंडकर हे शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कंपनी गोडाऊन जवळ असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. यावेळी प्रतिकार करत असताना त्यांचा उजव्या हाताचा पंजा तुटून जागेवर पडला. त्यानंतर संतोष हे बचाव करण्यासाठी पळत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्याच्या तोंडावर व डोक्यावर अनेक वार करत त्यांचा खून केला. संतोष यांचा मृतदेह आढळला त्या ठिकाणापासून दोनशे फुट अंतरावर त्याच्या उजव्या हाताचा पंजा सापडला. दरम्यान, खेड पोलीस स्टेशनचे निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.
सेझमध्ये जीवघेणी व्यावसायिक स्पर्धा
खेड तालुक्याच्या सेझमध्ये कंपनीची ठेकेदारी स्पर्धा जोरात सुरु असते. ही जीवघेणी स्पर्धा ठरली आहे. या ठिकाणी कंपन्यांचा वाढता विस्तार त्यात मिळणाऱ्या ठेकेदारी वरुन वाद हे नित्याचे झाले आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेक गंभीर घटना घडल्या आहे. या घटना लक्षात घेता या परिसरात कायम स्वरुपी पोलिस चौकीची मागणी ग्रामस्थांनी केली होती. तसेच चार वर्षांपूर्वी अशाच प्रकरणात कनेरसर ग्रामपंचायत उपसरपंचाचा देखील खून झाला होता.
याच अनुषंगाने
खेड पोलीस स्टेशनने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पथक व चाकण पोलीस स्टेशनच्या मदतीने २४ तासांचे आत केला खुनाचा गुन्हा उघड मिळालेल्या माहितीनुसार असे की….
त्यांबाबत खेड पोलीस ठाण्यात गु. रजि.नं.८१७/२०२३ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन त्याची फिर्याद, त्याचा भाऊ पंकज रामदास दौडकर रा. कनेरसर, ता. खेड, जि. पुणे. यांनी दिलेली आहे.
सदर गुन्हयात कोणताही पुरावा हाती लागलेला नसताना व कोणतीही उपयुक्त माहीती प्राप्त झालेली नसताना सदर गुन्हयाचा तपास मा. अंकीत गोयल सो पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण मा. मितेश घट्टे सो, अप्पर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग, मा. सुदर्शन पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली चालु केला.
सदर गुन्हयाचे तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रमीण येथील पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचेकडील पथकातील पोलीस उप निरीक्षक सावंत पो. हवा तापकीर, पो.हवा. साबळे, पो. कॉ. सुपेकर, व चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम व पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे मदतीने गोपनिय माहीती काढुन
पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे खेड पोलीस स्टेशन यांनी व त्याचे पथकातील सहा पोलीस निरीक्षक बी. एन काबुगडे, पोलीस उपनिरीक्षक खबाले, पोलीस उपनिरीक्षक राउत, सहा पोलीस फौजदार शंकर भवारी, पोलीस हवालदार मोरे , पो.हवा. घोलप , पो.ना. गैंगजे , पो. कॉ. बांडे , पो.कॉ. गोडसे , पो.कॉ. भंडारे , पो. कॉ.लोहार , पो. कॉ. शिंगाडे , पो. कॉ. गव्हाणे या पोलीस अंमलदारांनी गोपनिय बातमीदारामार्फत माहीती काढुन
सदर गुन्हयातील पाच आरोपी निष्पन्न करून त्याचेकडे कसोशीने तपास करून खुनाच्या गुन्हयात आरोपीतांबाबत कोणताही पुरावा नसताना १६ तासांचे आत उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिकचा तपास चालू आहे.