प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यामध्ये एकूण ११ प्राथमिक आरोग्य केंद्र असून सर्व प्राथमिक आ. केंद्रा- मध्ये पुणे जिल्हा परिषद, पुणे – आरोग्य विभागामार्फत कुटुंब नियोजन समुपदेशन किट . चे वितरण करण्यात आले आहे.आज प्राथ. आ. केंद्र, शेलपिंपळगांव येथील ४५ आशा स्वयंसेविका यांना हे किट देण्यात आले. या किटमध्ये एक 2 माहिती पुस्तिका, पाळणा लांबवण्याच्या साधनांची माहिती हस्तपत्रिका तसेच काही मॉडेल्स पुरविण्यात आलेली आहेत.
वाढत्या लोकसंख्या दर कमी करणे, HIV व अन्य काही आजारांना आळा घालणे,तसेच वारंवार गरोदरपण किंवा गर्भपातामुळे होणाऱ्या मातामृत्युस आळा घालणे यासाठी कुटुंबनियोजनांच्या साधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे.प्रा. आ. केंद्र – शेलपिंपळगांव अजूबाजूच्या १९ गावांना सेवा देते.याप्रसंगी तालुका आरोग्य अधि. डॉ. इंदिरा पारखे, वैद्य. अधि. डॉ. साईनाथ मानकरी आरोग्य सहायिका ज्योती रणदिवे, आशा गटप्रवर्तक सौ. छाया इंगळे, कुंदा गायकवाड आणि इतर आशा उपास्थित होत्या.