वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चाकण जि.पुणे यांची बदली.

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन आदेश क्रमांक बदली-२०२३/प्र.क्र.२४१ /सेवा-२, दिनांक : ३० ऑगस्ट, २०२३ नुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाच्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) (दोन) आणि कलम ६ मधील तरतुदीनुसार डॉ. राजश्री ढवळे, (वै.अ., ग्रा.रु., चाकण जि.पुणे) यांची बदली सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुटुंबकल्याण), पुणे या पदावर करण्यात आली आहे.

कलम ४ मधील (४) नुसार शासकीय कर्मचानऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यात येतात. परंतु, खाली नमूद केलेल्या परिस्थितीत वर्षातील कोणत्याही वेळी अशी बदली करण्यात येते. यातीलच क्रमांक ( दोन ) नुसार अपवादात्मक परिस्थितींमुळे किंवा विशेष कारणांमुळे बदली करणे आवश्यक आहे. अशी सक्षम प्राधिकान्याची खात्री पटली असेल तर ते वरिष्ठांच्या मान्यतेनुसार बदली करू शकतात. कलम ६ नुसार अधिकाऱ्यांच्या बाबतीत विभागीय किंवा जिल्हा स्तरावर काम करीत असलेला विभाग प्रमुख, अशा अधिकाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यास सक्षम असेल आणि जिल्हा प्रमुख अशा अधिका-यांची जिल्हांतर्गत बदली करण्यास सक्षम असेल.

वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजश्री ढवळे यांच्याविषयीच्या तक्रारी व आरोपांबाबत चौकशी करून कार्यवाही करणेची मागणी दि.१०/०८/२०२३ रोजी चाकण शहर अध्यक्ष अँड. प्रितम रामदास शिंदे यांनी निवेदनाने केली होती. तसेच सदर तक्रारी व आरोपांबाबत मंत्रालयात देखील पत्र व्यवहार करण्यात आला होता. तद्नंतर प्रत्यक्ष भेटी व पाठपुराव्यानंतर शासनाने दखल घेत दि- ३०/०८/२०२३ रोजी वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजश्री ढवळे यांची बदली करण्यात आली आहे.

शासकीय कर्मचारी यांच्या सेवा कार्यात अशा प्रकारे घडणाऱ्या अपवादात्मक परिस्थितीची, विशेष कारणांची व घटनांची दखल घेण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनात नमूद केलेली होती. निर्माण झालेली अपवादात्मक परिस्थितीची व विशेष कारणांची दखल घेत तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या विनंतीचा विचार करून सदर बदली करण्यात आली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!