लक्ष्मी ग्रुप चाकण यांचे वतीने. युवा उद्योजक कै. शातारामशेठ महादु भुजबळ यांचे स्मृती प्रित्यर्थ सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, उद्योग, धार्मिक, आध्यत्मिक तथा राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी “जीवन गौरव” आणि युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यावर्षीचा लक्ष्मीग्रुपच्या वतीने देण्यात येणारा “जीवन गौरव” पुरस्कार हा शिरुर लोकसभा मतदारसंघांचे माजी खासदार आणि शिवसेना उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील खासदार मा. शिवाजीराव आढळराव पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन यशस्वी उद्योजक म्हणून केलेली वाटचाल आणि त्यासोबतच गेली २५ ते ३० वर्षे उत्कृष्ट संसदपटू म्हणून केलेली कामगिरी म्हणुनच “लक्ष्मी ग्रुपच्या “वतीने मा. खासदार मा. शिवाजीराव आढळराव पाटील “जीवनगौरव पुरस्कार ” देण्यात आला.
“युनिकेअर हॉस्पिटलचे मा. अमोल बेनके यांना “युवा गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चाकण औद्योगिक नगरी मध्ये अनेक कंपन्या ह्या त्यांचे हॉस्पिटलशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यातुन कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना अनेक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आरोग्य विषयक आणि आर्थिक समस्येतून मार्ग काढण्यासाठी साठी सदैव तत्पर असणारा आपल्या हॉस्पिटलसाठी उच्चतम तंत्रज्ञानाचे अद्ययावत उपकरणातुन रुग्णांना तत्पर सुविधा उपलब्ध करून देणारे हे सेवाव्रती आहेत.
दोस्ती ग्रुप तथा दोस्ती उद्योग समुहाचे भानोबाची कोयाळी गावचे रहिवासी आणि याच गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल आल्हाट यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.