प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून मावळ तालुक्यातील जांबवडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थीना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप जांबवडे गावचे विद्यमान उपसरपंच अंकुश घोजगे तसेच त्यांच्या पत्नी सायली अंकुश घोजगे यांच्या तर्फे करण्यात आले . तसेच प्रशांत मारूती शिवेकर यांच्या कडून शालेय ड्रॉईंग बुक व ड्रॉईंग किट ह्या वस्तू देण्यात आल्या.मुलांना मिळालेल्या शालेय वस्तु व खाऊमुळे मुलांच्या चेहऱ्यावर वेगळीच तेजी आलेली होती.

अन्न, वस्त्र, निवारा, याचबरोबर शिक्षण हि सुद्धा लहान मुलांची मुलभुत गरज आहे. त्यांना हवी असलेली मुलभुत सुविधा त्यांना मिळत नसल्याने त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण होणे कठीण झालेले आहे. यासाठी आम्ही एक छोटीशी मदत म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या शालेय वस्तू चे वाटप करत आहोत आणि इथून पुढे देखील करत राहणार असे उपसरपंच अंकुश घोजगे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी संजय भांगरे(तंटामुक्ती अध्यक्ष जांबवडे), जगन्नाथ नाटक( पोलिस पाटिल जांबवडे), भरत घोजगे(चेअरमन सुदूंबरे सोसायटी), पोलीस उपनिरीक्षक विशाल भोसले,विकास भांगरे( मा.उपसरपंच जांबवडे), शामराव भोसले(मा.उपसरपंच जांबवडे), बाळासाहेब शिंदे(ग्रा.पंचायत सदस्य), सोपान भांगरे(शालेय व्यवस्थापन अध्यक्ष जांबवडे), योगेश नाटक(पाटील), सागर शिंदे , दत्ता घोजगे,महादेव भालशंकर(सर), पोटे(सर),लहू घोजगे( गुणवंत कामगार कॅडबरी कंपनी) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव भालशंकर(सर) तर आभार सोपान भांगरे यांनी व्यक्त केले.