प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- रासे गावातील नागरिकांना प्रधानमंत्री जनआरोग्य अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेचे आयुष्यमान व आभा कार्डचे नावनोंदणी करण्यात आली आहे.गेल्या 2 दिवस आरोग्य विभागाकडून भरविण्यात आलेल्या या शिबीरात 288 ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. व त्यांची नावनोंदणी आरोग्य विभागा मार्फत केली आहे. लवकरच येत्या काही दिवसात लाभार्थ्यांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती ग्रामसेविका मंगल खरपुडे यांनी बोलताना सांगितले.

पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना व महात्मा जोतिबा फुले योजना या सरकारच्या योजनेमध्ये सर्व सामान्य नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात.. यामध्ये योजनेमध्ये अनेक गंभीर आजारांवर उपचार केले जात असुन सर्व सामान्य जनतेला याचा मोठा फायदा होत आहे. तसेच आरोग्य विभागाने आभा कार्ड देखील सोय केली असुन रुग्णाचा आजारांचा इतिहास त्यामध्ये साठवण करता येणार आहे.

या दोन्ही योजनेसाठी रासे गावात आरोग्य विभागाने घेतलेल्या शिबिरात अनेक ग्रामस्थांनी 2 दिवस आपली नावनोंदणी करून घेतली आहे .त्यामुळे ग्रामस्थांना या योजनेचा भविष्यात फायदा होणार असुन 288 ग्रामस्थांची नावनोंदणी केली गेल्याची माहिती दिली असुन लवकरच त्यांना पंतप्रधान आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.