प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील कडूस येथील झालेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील अनेक गावांनी कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवून आपला संताप व्यक्त केला होता.तालुक्यातील प्रतिपंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या कडूस गावात एकादशीला हा धक्कादायक प्रकार घडला होता. हे अधार्मिक कृत्य करण्याऱ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आळंदी देवस्थानकडुन करण्यात आली असुन याचे पत्र पुणे ग्रामीण पोलिसांना देण्यात आले आहे.

क तिर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडूस माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा असे ६ दिवस पांडुरंग येतात. संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी १ टाळकरी हे कडूस गावचे आहेत.अशा पवित्र ठिकाणी आषाढी एकादशीला खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कडूस गावात गोहत्येचा प्रकार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमुळे उघडीस आला होता.या घटनेच्या निषेधार्थ हिंदू बांधवांनी तालुक्यातील अनेक गावे,तालुका शहर बंद करून मोर्चा काढून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांना निवेदन दिले आहेत.

आरोपी साबीर शौकत मुलानी,उर्फ इनामदार, व शाकिर शौकीत मुलानी उर्फ इनामदार व इतर ४ जणांनी मिळून हिंदू धर्मातील पवित्र मानले जाणाऱ्या गाईची हेतुपूर्वक कत्तल करून हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या.या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असुन वारंवार धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी पोषक कृत्ये केली जात आहेत. अशा संबंधित व्यक्तींवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल व प्राणी सरंक्षण २९५ अ गोहत्या बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अशा घटना पुन्हा न घडण्यासाठी सदर व्यक्तींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे मागणीचे पत्र ग्रामीण पोलिस अधीक्षक देण्यात आली आहे.