प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज लांडेवाडी येथील शिवाजी आढळराव पाटील यांच्या जनता दरबारात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे खेड शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवाजीदादा आढाळराव पाटील यांचे पुन्हा एकदा वर्चस्व वाढत चालायचे दिसून येऊ लागले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवाजी आढाळराव पाटील यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आढळराव पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून तालुक्यातील जनतेची अनेक विकासकामे मार्गी लावली. अनेक विकास कामांचा शुभारंभ,भुमीपूजन करून कामे चालू झाली.त्यामुळे ग्रामीण भागातील गावांचा विकास होऊन पुन्हा आढळराव पाटील यांचे वर्चस्व ग्रामीण भागात जोर धरू लागले आहेत. लांडेवाडी येथील निवासस्थानी होणाऱ्या जनता दरबारात अनेक नागरिक समस्या घेऊन येत असुन मोठी गर्दी जनता दरबारात पाहायला मिळत आहेत. आज देखील जनता दरबारात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. व शिवाजी आढळराव पाटील यांना पाठींबा दिला आहे.पहा विडिओ