प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- आळंदी येथील माऊलींच्या प्रस्थानावेळी झालेला वारकरी व पोलीस यांमध्ये गोंधळ झाला. अनेकांनी बॅरिकेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व वारकरी यांमध्ये गर्दी पांगवण्यासाठी झटापट झाली परंतु कोणताही लाठीचार्ज झाला नाही असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांलायचे पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.ज्ञानेश्वर माऊलींची निघालेली पालखी आनंदाने पंढरपूरला जाऊ द्या असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

यावेळी पोलीस आयुक्तांनी बोलताना सांगितले की,मागील वर्षी पालखी प्रस्थानावेळी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक मानाच्या पालखीतील 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आला होता. सर्व मानाच्या दिंडीतील प्रत्येकी 75 जणांनाच पास देण्यात आले होते.व त्या दिंडीतील वारकऱ्यांना आतमध्ये सोडले होते.परंतु अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला .मंदिर विश्वस्त आणि चोपदार यांनी समजावून सांगितले तरी, त्यांनी ऐकले नाही व त्यांनी बॅरिकेट तोडून आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांनी आणि पोलिसांची किरकोळ झटापट झाली मात्र कुठेही वारकऱ्यावर लाठीचार्ज झाला नाही.त्यानंतर गर्दीला पांघवण्यात पोलिसांना यश आले.