प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी पोलिसांत व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन आलेल्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना आज आळंदीत घडली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील पहिलीच घटना पालखी प्रस्थानावेळी घडली आहे.पहा विडिओ..
दरवर्षी लाखो वारकऱ्यांसोबत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पायी आळंदी येथून पंढरपुरकडे प्रस्थान ठेवत असते. अनेक वारकरी आपल्या दिंड्या सोबत घेऊन येत असतात. यावर्षी देखील हजारो वारकरी आळंदी मध्ये दाखल झाले होते. परंतु माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी वारकरी व पोलिसांत धक्काबुकीं होऊन आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने वारकरी संप्रदायाने संताप व्यक्त केला आहे.