प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- आज अलंकापुरीत आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकिशन पवार यांनी आज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनाची पाहणी केली व राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य विभागाकडून उत्तमरित्या सुविधा पुरवण्याचे सांगितले.

आळंदी देवस्थान येथील वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, आंतररुग्ण व्यवस्था,आपत्कालीन व्यवस्था यांची पाहणी केली. पुणे जिल्हा परिषद, पुणे आरोग्य विभाग यांचे आरोग्य सेवा पथके, टँकर तपासणी पथके, हॉटेल तपासणी पथके यांची देखील माहिती माननीय उपसंचालक यांनी या प्रसंगी घेतली.

आळंदी देवस्थान येथील विश्वस्त समिती सोबत बैठक घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी आळंदी शहराचे माजी नगरसेवक श्री.डी.डी. भोसले पाटील साहेब,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, ग्रामीण रुग्णालय आळंदी वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे ,विस्तार अधिकारी श्री. सुधाकर म्हाकाळे, श्री ज्ञानेश्वर आढाव ,श्री.कुलकर्णी ,श्रीम.वैष्णवी देशमाने, श्रीम. कविता उभे आदी कर्मचारी उपस्थित होते.