चाकणमध्ये संजय राऊतांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून निषेध

प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे :- पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊतांनी थुंकूल्याने व शिवसेना नेत्यांचा अपमान केल्याने चाकण येथे खेड तालुका शिवसेनेच्या वतीने संजय राऊतांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.आज दुपारी बारा वाजता चाकण येथील महात्मा फुले चौकात संजय राऊतांच्या फोटोला चप्पलने जोडो मारून आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला.तसेच संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आले.

उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांनी थुंकून उत्तर दिल्याने व शिवसेनेच्या नेत्याचा अपमान केल्याने राज्य भरात संजय राऊतांच्या निषेधार्थ शिवसैनिकानी आंदोलन केले. चाकणमध्ये देखील संजय राऊतांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून तालुक्यातील शिवसैनिकानी निषेध व्यक्त केला. पुन्हा जर मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाच्या विरोधात बेताल व्यक्तव्य केले तर जशास तसे उत्तर शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाशदादा वाडेकर,तालुकाप्रमुख राजु जवळेकर,उपतालुकाप्रमुख काळुराम खैरे,युवाप्रमुख विशाल पोतले, चाकण शहराध्यक्ष अक्षय जाधव,संतोष हजारे, सरपंच, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!