प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील रासे या गावातील ग्रामपंचायतीच्या वायरमनचा धक्कादायक प्रताप समोर येऊ लागला आहे. रासे ग्रामपंचायतीने नेमणूक केलेल्या वायरमनचा मनमानी कारभारामुळे गावातील नागरिक अक्षरशः वैतागले आहेत.ग्रामपंचायतीची कामे सोडून चक्क वायरमन चिरीमिरी घेऊन खाजगी कामे करण्यात पटाईत असल्याचे समोर येऊ लागले आहे.

रासे ग्रामपंचायतीने गावातील विजेच्या कामासाठी वायरमनची नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायतीची अनेक विजेची कामे दिवाबत्ती, ट्रान्स्फर दुरुस्ती, फ्फुज बसवणे सदर वायरमन कडून केली जातात. परंतु ग्रामपंचायतीने नेमलेला वायरमनच्या मनमानी कारभारामुळे गावातील विजेची कामे वेळेवर न होता ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यातच हा बहाद्दर ग्रामपंचायतीचे काम सोडून चिरीमिरी साठी दुसरीकडे खाजगी कामात वेळ घालवत असुन नागरिकांचे वेळेला फोन देखील उचलत नसल्याने समोर येऊ लागले आहे.अनेक वेळा ग्रामस्थांनी सांगुन देखील त्या ठिकाणची कामे लवकर होत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.त्यामुळे विजेच्या कामासाठी ग्रामस्थांना या मनमानी वायरमनची वाट पहावी लागत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांनी सांगून देखील नागरिकांची कामे होत नसुन त्यांना जुमानत नसल्याने अशा वायरमनचा गावासाठी फायदा काय?? असा प्रश्न उभा राहत आहे.त्यामुळे अशा नेमणूक केलेल्या मनमानी वायरमनवर ग्रामपंचायत काय निर्णय घेणार?? का गावातील नागरिकांना हाल सोसावे लागणार हेच पाहावे लागेल.