प्रतिनीधी कुणाल शिंदे
पुणे :- रासे येथील श्री रेणुका माध्यमिक विद्यालयाचा सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाचा दहावीचा निकाल 100% टक्के लागला आहे.आपल्या 100% निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाने यश प्राप्त केले आहे.या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली असुन त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

रासे गावातील श्री रेणुका माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीमध्ये 40 विध्यार्थी शिक्षण घेत होते.यापैकी सर्व विध्यार्थी हे S.S.C बोर्डाच्या परीक्षेला बसले होते.फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दहावीच्या या परीक्षेत सर्व 40 विध्यार्थी उत्तीर्ण झाले असुन महाविद्यालयाने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.या परीक्षेत प्रथम तीनही क्रमांक मिळवून मुलींनी बाजी मारली असुन त्यांना सर्वोत्तम गुण मिळाले आहेत.

त्यापैकी प्रथम क्रमांक कु तेजस्वी सुभाष जाधव या विद्यार्थ्यांनीला 96.60 गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच द्वितीय क्रमांक कु तेजस्विनी दत्तात्रय भांडोरी 95.20 टक्के व कु तृतीय क्रमांक कु अंकिता संतोष शिंदे 91.80 या विद्यार्थिनीनी परीक्षेत बाजी मारली आहे.

श्री रेणुका महाविद्यालयाची गेली 8 वर्ष 100% निकालाची परंपरा कायम ठेवत परिसरात आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना अध्ययनाचे धडे गिरवणारे नागरिकांकडून शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षकांचे कौतुक होत आहे.