प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील गावभेट दौऱ्यामध्ये बहुळ ते डबरेवस्ती येथील रस्त्याचे जिल्हा वार्षिक आराखड्यातून ५० लाख रुपये निधीच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते भुमीपूजन करून रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

या भुमीपूजन कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजयसिंह शिंदे पाटील, स्व.आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे चिरंजीव ओंकार दादा गोरे युवासेना जिल्हाप्रमुख पै.धनंजय बापू पठारे मा.उपसभापती ज्योतीताई आरगडे, मा.पंचायत समिती सदस्य संचालक वि.कार्यकारी सोसायटी सुरेखाताई वाडेकर, तालुका प्रमुख युवासेना विशालआप्पा पोतले, शिवसेना विभागप्रमुख संतोषशेठ सातपुते, बहुळ गावच्या सरपंच सौ अश्विनीताई साबळे,उपसरपंच श्रीमती शकुंतला ताई वाडेकर ,व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.