प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- यावर्षी होणाऱ्या आषाढी वारीसाठी पालखी सोहळ्याला पालखी सोहळा प्रमुखपदी अँड विकास ढगे पाटील यांची पुन्हा एक मताने निवड करण्यात आली. संस्थांन कमिटीच्या झालेल्या बैठकीमध्ये यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.अशी माहिती संस्थांनचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.

अँड विकास ढगे पाटील हे दोन वेळा संस्थांचे प्रमुख विश्वस्त व तीन वेळा पालखी सोहळा प्रमुख म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पडण्याची संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान पासून ते पंढरपूरमध्ये दाखल होईपर्यंत व त्यानंतर पंढरपुरातून पालखी सोहळा आळंदीमध्ये परत येईपर्यंत सोहळ्यासोबत असलेल्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे सुरक्षेची काळजी घेऊन संपूर्ण सोहळा वैभवात आनंदात शिस्तीत व जल्लोषात पार पाडण्यासाठी प्रयत्न करून प्रत्येक वर्षी करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या वर्षी देखील प्रशासनाच्या सोबत काम करून पालखी सोहळा आनंदाने पार पाडण्यासाठी नियोजनाची तयारी करत आहे.