प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण तळेगाव चौकातील वाहतूकोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने सुरू केलेली माणिक चौकातून एकेरी वाहतूक ही जुन्या पुणे नाशिक महामार्गावर वळविण्यात आली आहे.परंतु बाहेरून आलेल्या वाहनांना यांची माहिती नसल्याने व तेथे रात्रीच्या वेळी कोणतेही दिशादर्शक फलक किंवा सिग्नल अजुन बसविण्यात आला नव्हता. याची जाणीव झाल्याने चाकण मधील नगरसेवक धीरज मुटके यांनी लोकप्रिय आमदार मा.श्री दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिसानिमित्त तसेच पोलिस निरीक्षक मा महिंद्र अदलिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस वाहतूक विभाग यांना माणिक चौक चाकण येथे LED scroll board दिशा फलक बसवून देण्यात आला.

त्यामुळे वनवे आसल्यामुळे लांब पल्ल्याच्या मोठ्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांना दिशाभूल होऊन पर्यायाने वाहतूक समस्या उद्भवत होती. त्यामुळे वाहतूक समस्या पूर्ण पणे कमी होईल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.चाकण मधील वाहतूककोंडी व अपघात अजूनही काहि कमी होताना दिसत नाही, प्रशासनाकडून व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून अनेक उपाय केले जातात. परंतु ते उपाय तोकडे पडत असुन उड्डाणपूल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही,,असे चाकणकर नागरिकांमधुन बोलले जात आहे.