प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :;- शिरूर लोकसभेचे शिवसेना पक्षाचे माजी खासदार व जनतेच्या मनातील लोकप्रिय असलेले मा.शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज लांडेवाडी येथील घरी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.शिरूर मतदार संघातील अनेकजण दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

यावेळी तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या अनेक पदाधिकारी,जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच,अनेकांनी आपल्या लोकप्रिय दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर गर्दी केलेली पाहायला मिळाली. अनेक जण दादांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आले होते.
