प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे ;- पुणे जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र,आशा वर्कर,व स्वयंसेविका यांचा गुणगौरव समारंभ सोहळा पार पडला. या सोहळ्यात खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील आरोग्य केंद्राला तालुक्यातील उत्कृष्ट आरोग्य केंद्र म्हणून पुरस्कार मिळाल्याची माहिती केंद्राच्या अधिकारी डॉ पारखे यांनी स्वराज्य वार्ता चॅनेलशी बोलताना दिली.

पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून दरवर्षी जिल्यातील उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा सेविका,व कायाकल्प बक्षीस वितरण सोहळा साजरा केला जातो. यावर्षीच्या 2022-2023 पुरस्कार सोहळा देखील पुणे जिल्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील,व सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थित गुणगौरव सोहळा पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला.

यावेळी खेड तालुक्यात उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य केंद्राचा पुरस्कार शेलपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला अजून एक पुरस्काराची भर पडली आहे. शेलपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपचार,लसीकरण व रुग्णालयातील स्वच्छता यामुळे अनेक परिसरातील रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत आहेत.अनेक रुग्णांना या। केंद्राचा फायदा होत असुन उपचारासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.त्यामुळे तालुक्यातील उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा बहुमान मिळाल्याचा डॉ पारखे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे मनपा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. अभय तिडके आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन आरोग्य पत्रिका यांचे संपादक डॉ. कैलास बाविस्कर हे देखील उपस्थित होते.