प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणूकित दोन्ही पॅनेलची जोरदार लढत शेवटपर्यंत पाहायला मिळाली. अनेक प्रतिष्ठित उमेदवारांचा पराभव यावेळी पाहायला मिळाला.मात्र बाजार समितीच्या या निवडणुकीत अनेक उमेदवारांना आर्थिक तडजोडीचा भक्कम पाठींबा मिळाल्याने त्यांची संचालक पदावर वर्णी लागली आहे. आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून तो पुढीलप्रमाणे…
भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेलचे विजयी उमेदवार..
१) दिलीप मोहिते (589)राष्ट्रवादी विजयी
२) विनोद टोपे(748) राष्ट्रवादी विजयी
३) कैलास लिंबोरे (975) राष्ट्रवादी विजयी
४) जयसिंग भोगाडे (812)राष्ट्रवादी विजयी
५) विठ्ठल वनघरे(741)राष्ट्रवादी विजयी
६) हनुमंत कड (942)राष्ट्रवादी विजयी
७) कमल कड (960)राष्ट्रवादी विजयी
८) रंजीत गाडे(903)राष्ट्रवादी विजयी
९) अशोक राक्षे (934)राष्ट्रवादी विजयी
10) सयाजी मोहिते (201) राष्ट्रवादी विजयी
असे एकूण 10जागांवर उमेदवार निवडून आले आहेत.
भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे…
१) सोमनाथ मुंगसे (639)सर्वपक्षीय विजयी
२) विजयसिंह शिंदे(859)सर्वपक्षीय विजयी
३) अनुराग जैद (754)सर्वपक्षीय विजयी
४) क्रांती सोमवंशी (600)सर्वपक्षीय विजयी
५) सागर मुर्हे (819)सर्वपक्षीय विजयी
६) सुधीर भोमाळे (704)सर्वपक्षीय विजयी
तर अपक्ष म्हणून निवडून आलेले विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे..
१) महेंद्र गोरे (567)अपक्ष विजयी
२) माणिक गोरे (580)अपक्ष विजयी
असे दोन्ही पॅनलचे मिळवून 18 जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. एकूणच या वर्षी झालेल्या बाजार समितीसाठी अनेक उमेदवारानी आपली प्रतिष्ठा व आर्थिक तडजोड करून सभासदाचा भक्कम पाठींबा मिळवल्याचे पाहायला मिळाले.