प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी झालेंल्या निवडणूकित आज तालुक्यात मतदान झाले. त्यापैकी चाकण येथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर ग्रामपंचायत,सोसायटी ,व आडतदार, व्यापारी, यांनी सर्वांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली.त्यामुळे चाकण केंद्रावर आज 99% मतदान झाल्याचे निवडणूक अधिकारी जगताप यांनी सांगितले.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली 5 वर्ष राष्ट्रवादी पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे. यावेळी मात्र तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार एकत्र आल्याने ही बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चिन्हे दिसू लागली होती.त्यामुळे आज बाजी मारण्यासाठी अनेक उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.

चाकण येशील मतदान केंद्रावर ग्रामपंचायतीचे एकूण 247 मतदानापैकी 246 मतदान व सोसायटीच्या एकूण 222 मतदानापैकी 221 मतदान झाल्याने आज 99% मतदान झाल्याचे निवडणूक अधिकारी जगताप यांनी बोलताना सांगितले. मतदान केंद्रावर सकाळ पासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर चाकण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व मतदारांनी हजेरी लावल्याने वेळेत व शांततेत मतदान पार पडले.आता सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.