प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :;- चाकण शहरात आज भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे धडाकेबाज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच पथारीधारक यांना छत्री व गरीब शालेय मुलांना वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे स्थान चाकण शहरात व खेड तालुक्यात अजुन बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी त्यांनी केले.
आमदार नितेश राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर कडक टिका करत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले. औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना व्यवसाय व संधी मिळाली यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले. तसेच तरूणांसाठी कधीही व कितीही वेळा बोलवले तरी येणार असल्याचे सांगितले.

चाकण शहरातील मार्केट यार्ड शेजारी असलेल्या मांजरे स्टीलच्या मागिल जागेत भारतीय जनता पार्टीचे कार्यालय उभारण्यात आले होते. सदर कार्यालयाचे उद्घाटन आज कोकणातील कणकवली मतदार संघाचे धडाकेबाज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज सायंकाळी पार पडले.

सायंकाळी ६ वाजता आमदार नितेश राणे यांचे चाकण शहरात आगमन झाले त्यावेळी आंबेठाण चौकामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व माजी जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन व फटाके फोडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय परिसरात फटाक्यांची अतिषबाजी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले.

आमदार नितेश राणे यांचे भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड मालिनी शिंदे, तालुकाध्यक्ष कल्पना गवारी, शहराध्यक्ष वैशाली देशमुख, मा. शहराध्यक्ष रत्नमाला भुजबळ, नगरसेविका सुरेखा गालफाडे आदी महिलांच्या हस्ते औक्षण करण्यात आले.

भाजपा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमापूर्वी दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुजन करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत भाजपा पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी पक्षाच्या कार्यालयाला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. कार्यक्रमात चाकण बाजारातील पथारीवाल्यांना व्यापारी छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी महात्मा फुले नगर येथील गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. महात्मा फुले नगर येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन सरोदे यांनी सदर साहित्याचा स्वीकार केला. चाकण शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यात मुख्यत्वे मनसे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत जाधव, मनसे नेते सत्यवान बनकर, मनसे माजी शहराध्यक्ष गणेश उर्फ बाबा सोनवणे, मनसे शहर उपाध्यक्ष आदित्य गोरे, महाराणा प्रताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत परदेशी, सदस्य रवि परदेशी, सदस्य दत्तूसिंग परदेशी, भाग्येश घाटकर, रत्नेश घाटकर, चेतन सोनवणे, साक्षी बिसणारे यांसह असंख्य युवकांनी पक्षप्रवेश केला.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, कालिदास वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, नगरसेविका सुरेखा गालफाडे, शहराध्यक्ष ॲड प्रितम शिंदे, उद्योग आघाडी शहराध्यक्ष विक्रम परदेशी, आध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष गुलाब खांडेभराड, आध्यात्मिक समन्वय आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय घुंडरे, माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, पांडुरंग ठाकुर, संपत बवले,

अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सचिव दीपक मराठे, सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष निलेश गोतारणे, चंद्रकांत हलगे, अनंत चंद्रचूड, शहर सरचिटणीस अर्जून बोऱ्हाडे, शहर उपाध्यक्ष जयदेव दुधानी, किरण वरखडे, युवा मोर्चा जिल्हा सचिव शाम पुसदकर, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष सहदेव तावरे, तानाजी लोखंडे, बाबा जगताप, श्रीकृष्ण इंगळे,
प्रविण करपे, किरण टिळेकर, मनोज बिसणारे, अरुण कुंभार, ज्ञानेश्वर बढे, गणेश गोरे, अशोक पालीवाल, नरेंद्र परदेशी, सौरभ जाधव, कुमार नवरे, कैलास कुचेकर, गुलाब पवार, पंढरीनाथ सुतार, योगेश ठोकळ, अकबर पठाण, नसीम पठाण, प्रशांत शेवकरी, निलेश रसाळ,

वाहतूक आघाडी शहर अध्यक्ष योगेश देशमुख, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष सुर्यकांत बारणे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस गणेश नाईक, नरेंद्र परदेशी, संतोष भोज, व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे निवेदन युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, नियोजन प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरमाटे, उद्योग आघाडी शहराध्यक्ष विक्रम परदेशी व आभार प्रदर्शन व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे यांनी केले.