प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठीक ठिकठिकाणी उत्साह साजरी करण्यात आली.यावेळी आंबेडकरी बांधवांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

१४ एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन म्हणून ओळखला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या दिवशी आंबेडकरी बांधव मोठ्या उत्साहाने व आनंदाने जयंती साजरी करतात. आज चाकणमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने पार पडली. यावेळी अनेक कार्यक्रमाचे आयोजन व भव्य रॅली चाकण शहरामधून काढण्यात आली होती.

तसेच ठिकठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून अभिवादन केले तसेच चाकण मधील मुस्लिम समाजातील बांधवांनी देखील रॅलीमध्ये सहभागी होऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्याने पाहायला मिळाले