प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असून रोजच कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत.खेड तालुक्यात देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असून आज पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वाफगाव या गावातील एका 70 वर्षीय महिलेचा कोरोनाने पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा सापडू लागले आहे.शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.आज देखील एक कोरोना रुग्ण सापडला असून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज तालुक्यात घडली आहे दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे त्यामुळे आता आरोग्य प्रशासन काय पावले उचलणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.