प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण पासुन अगदी जवळ असलेल्या रासे गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री रेणुकादेवीचे मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम अखेर पुन्हा सुरू होणार आहे. खेड तालुक्यात एकमेव असलेल्या श्री रेणुका देवी मंदिरांचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता.याची बातमी स्वराज्य वार्ता चॅनेलवर प्रसिद्ध झाली होती. याची दखल ग्रामसभेत घेऊन अखेर ग्रामस्थांनी रेणुकादेवी मंदिराच्या विकासासाठी आज बैठक पार पडली .त्यामुळे मंदिराच्या विकासाचे काम पुन्हा लवकरच सूरु होणार आहे.

रासे गावातील श्री रेणुकादेवी जागृत देवस्थान म्हूणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातुन येत असतात.रेणुका देवी नवसाला पावणारी देवी म्हणून देवीचा नावलौकिक भाविकांमध्ये आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवात नऊ दिवस देवीचा जागर व महापुजेचे आयोजन मोठ्या आनंदाने केले जाते.तसेच आषाढ महिन्यात देवीचा भंडारा साजरा करून आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.

अशा हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवीच्या मंदिराचा विकास गेल्या 4 5 वर्षांपासून रखडलेला होता. तो कधी पूर्ण होणार?? याची बातमी स्वराज्य वार्ता चॅनेलमधून 21 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.याची गावभर चर्चा होऊन अनेक ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. अखेर ग्रामसभेत विषय उपस्थित केल्यानंतर रेणुका मंदिराच्या जिर्णोद्धाराचा संकल्प करण्यात आला. त्याला यश प्राप्त झाले असुन गावातील गट नं 451 मधील जमीन मालकांनी स्वखुशीने मंदिराच्या कामासाठी आपली जमीन दान म्हणून देण्यात येणार असल्याने त्यांचे ग्रामस्थांनमधून कौतुक होत आहे.

यामुळे श्री रेणुका देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यासंदर्भात बैठक आज पार पडली. त्यामुळे मंदिराचे विकासकाम लवकरच सुरू होणार असुन कामाचे उद्घाटन लवकरच केले जाणार आहे.