प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण दुर क्षेत्राच्या हद्दीतील रासे गावातील संपूर्ण गावातील ग्रामस्थांना गेल्या फेब्रुवारी महिन्याचे लाईट बिलच आले नसल्याने बिल कसे भरायचे ?? असा मोठा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.त्यामुळे फेब्रुवारी महिना उलटून देखील लाईट बिले न आल्याने चाकण येथील महावितरण कंपनीचा आंधळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.दर महिन्याला येणारी लाईट बिले गायब कुठे झाली असा सवाल उपस्थित ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

महावितरण कंपनीची शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवण्याची अनेक उदाहरणे आहेत.अनेक बिलांवर चुकीचे रिडींग देऊन ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर येत असताना आता मात्र चक्क संपूर्ण गावालाच लाईट बिल न देण्याचा महावितरण कंपनीचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. रासे गावातील अंदाजे 4 ते 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात महावितरण कंपनीकडून दर महिन्याला लाईट बिले ही गावातील नागरिकांना वाटली जातात. परंतु फेब्रुवारी महिन्याची लाईट बिले ही अजुन मार्च महिना उजाडला तरीही अजूनही न मिळाल्याने लाईट बिल कसे भरायचे हा प्रश्न ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे वेळोवेळी लाईट बिले भरणारे गावातील शेतकरी व नागरिकानीं बिले नाही तर लाईट बिल भरणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.