प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील किवळे या गावातील दि, 10/03/2023 रोजी, फाल्गुन कृष्ण तृतीया तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला…
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथून पायी शिवज्योत घेऊन, राजगुरूनगर येथे क्रांती शिल्प, क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृतिस्थळी मानवंदना देऊन, सकाळी किवळे गावात शिवज्योतीचे आगमन झाले.सायंकाळच्या सत्रात पारंपरिक वाद्यांच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आलेली. पारंपरिक वेशभूषा करत शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.तसेच शालेय विद्यार्थ्यांची भाषणे, पाळणा गीत झाले.

तिथीनुसार शिवजयंती उत्सव निमित्ताने, व्याख्याते मोहन शेटे सर यांचे व्याख्यान संपन्न झाले. छत्रपती शिवरायांची युद्धनीती, सुरत लूट, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण, तसेच 26/11 हल्ल्याचा संदर्भ देत, सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात पुतळा उभारण्या बरोबरच सागरी सीमांचे संरक्षण करणे याकडेही लक्ष देणे, ही सरकारची भूमिका असायला हवी, आजच्या पिढीला प्रेरणादायी इतिहास हा शिवचरित्रातुन मिळेल हे सांगत असताना , या दिवशी किवळे गावात वाचनालय चालू होत आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची व अभिमानाची वाटते, असे मत व्याख्याते शेटे सर यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी गावातील ग्रामस्थ, युवा, युवती मोठया संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती…कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर शिवले, प्रास्तविक अमोल राऊत, आभार रुपेश वाळके यांनी मानले.
