प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- आज महिला दिनाच्या निमित्ताने चाकण पोलीस स्टेशनच्या महिला अधिकाऱ्यांचा बोधिसत्व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महिला पोलीस उज्वला कारले यांना आदर्श महिला म्हणून पुरस्कार देण्यात आला. तसेच चाकण ग्रामीण वैद्यकीय अधिकारी सौभाग्यवती ढवळे मॅडम यांचा सन्मान ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षिका नागेश्वर आष्टोळे यांचाही सन्मान ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

आज जागतिक महिला दिनानिमित्त समाजा त उल्लेखनीय काम करणाऱ्या व अन्यायाशी लढा देणाऱ्या अनेक महिलांचा सन्मान समाजातील संस्थांकडून केला जातो त्यानिमित्ताने आज चाकण पोलीस स्टेशनच्या महिलांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाराई महिलांचा बोधिसत्व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी बोधिसत्व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गौतम लक्ष्मण वाघमारे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाची मोर्चाचे खेड तालुका अध्यक्ष शहादेव तावरे, भारतीय जनता पार्टी चाकण शहर अध्यक्ष ॲड. प्रितम शिंदे, आरपीआयचे खेड तालुका सरचिटणीस संदेश कांबळे, आदर्श गायक राजू वानखेडे, विनोद बनसोडे, खेड तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष बंडू सोनवणे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष बाबा जगताप, बोधिसत्व बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्य गोकर्ण हसणारे, मेजर दामले साहेब, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला उपाध्यक्ष ॲड मालिनीताई शिंदे, फ्रेंड्स ऑफ बीजेपी तालुका संयोजक दत्ता परदेशी आदी उपस्थित होते.
